टेलिमेडिसीन साठी संमतीपत्र
बोर्ड ऑफ गव्हर्नर्स (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया च्या जागी) यांनी नीती आयोगाशी सहकार्य करून "टेलिमेडिसिन प्रॅक्टीस गाईडलाईन्स" तयार केल्या असून त्यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २५.०३.२०२० रोजी पत्र क्रमांक V.११०१२/०७/२०२०-MEP द्वारे मान्यता दिली आहे आणि बोर्ड ऑफ गवर्नर्स ने २५.०३.२०२० रोजी त्यांना पत्र क्रमांक MCई-२११(२)/२०१९(Eथिcस)/२०१८५५ द्वारे अधिसूचित केलेले आहे. नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना (साक्षर व )सक्षम करण्यासाठीच्या या मार्गदर्शक तत्वांमधे दिलेल्या व्याख्येनुसार, टेलीमेडिसिन अथवा दूर अंतरावरुन दिलेल्या आरोग्य सेवेचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. ज़ेंव्हा आरोग्य सेवा देताना अंतर ही महत्वाची अडचण ठरू शकेल, त्यावेळी रुग्णाविषयक रोगनिदान, उपचार तसेच आजाराचा आणि नुकसानीचा प्रतिबंध करण्यासाठी, संशोधन आणि मूल्यांकन करण्यासाठी, तसेच आरोग्य सेवा प्रदान करणार्यांच्या निरंतर प्रशिक्षणासाठी आणि जे; सर्व व्यक्ती आणि त्यांचा समूहाच्या आरोग्याच्या संवर्धनासाठी असेल, त्यासाठी माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व आरोग्य व्यावसायिक वैध माहितीचे आदान प्रदान करु शकतील.
नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक म्हणजे अशी व्यक्ती जिचे नाव IMC कायद्यानुसार राज्याच्या रजिस्टर मधे अथवा राष्ट्रीय रजिस्टर मधे नोंदवलेले आहे.
मी (रुग्णाशी नाते) Xa Xb Xc वय ( पुरुष / स्त्री / इतर ) टेलेमेडिसिन अथवा दूर अंतरावरुन, दूरध्वनी अथवा माहितीच्या मायाजालाचा (इंटरनेट / इलेक्ट्रॉनिक प्रणाली) वापर करून सल्ला देण्यासाठी डॉ. Ya Yb Yc यांना संमती देत आहे.
१. उद्देश :
मला हे माहीत आहे की टेलीमेडिसिन चा उद्देश आणि फायदा ज्या रुग्णांना काही कारणाने डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही अश्यांना वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी साक्षर व सक्षम करणे असा आहे.
२. पत्ता:
मी नमूद करतो की मी Z रुग्णालय / क्लिनिक, शहर, राज्य देश येथील डॉ Ya Yb Yc यांना विनंती करते वेळी शहर / राज्य / देश (पोलिस स्टेशन जवळ) असून मी डॉक्टरांशी देशाबाहेरून दूरभाष अथवा संपर्क करत नाहीये.
३. ई संपर्क:
टेलीमेडिसीन मधे इलेक्ट्रॉनिक संप्रेषणांचा (साधनांचा) उपयोग करुन रुग्णाची काळजी घेण्यासाठी भिन्न ठिकाणी उपस्थित आरोग्य सेवा कर्मचारी, सल्लागार वा डॉक्टर रुग्णाची माहिती मिळवतात हे मला माहीत आहे. तिचा वापर रोगनिदान, चिकित्सा आणि प्रगतीचे मूल्यमापन तसेच रुग्णाच्या आरोग्यशिक्षणासाठी करतात ज्यामधे खालील गोष्टींचा समावेश होऊ शकतो.
अ. रुग्णाच्या वैद्यकीय नोंदी,
ब. वैद्यकीय प्रतिमा,
क. ऑडियो, व्हिडिओ रेकॉर्डिंग,
ड. वैद्यकीय उपकरणांमधून निर्माण होणारी माहिती,
यांचे वैद्यकीय सल्लागारास थेट प्रसारण अथवा साठवून ठेवणे.
४. सुरक्षा :
या साठी इलेक्ट्रॉनिक प्रणाली एकमेकांशी जोडण्यासाठी वापरल्या जाणार्या संगणक आज्ञावलीमधे रुग्णाच्या माहितीची गोपनीयता राखण्यासाठीचे सुरक्षा नियम समाविष्ट केलेले असतात हे मला माहीत आहे, परंतू त्यामधे खालील धोके संभवतात
अ. सुरक्षिततेत त्रुटी अथवा अपयश आल्यास रुग्णाच्या गोपनीय माहितीचे उल्लंघन होऊ शकते.
ब. संपूर्ण वैद्यकीय माहिती उपलब्ध नसल्यामुळे औषधांची प्रतिकूल परस्पर प्रतिक्रिया, एलर्जी अथवा इतर निर्णयांमधे चूक होऊ शकते.
५. टेलिमेडिसीन चे स्वरूप:
टेलिमेडीसिन समुपदेशनाचे स्वरूप खालील प्रमाणे असेल याची मला माहिती आहे :
अ. रुग्णाची वैद्यकीय माहिती, तपासणी, क्षकिरण आणि इतर तपासण्यांचे अहवालांबाबत वैद्यकीय सल्लागारांशी दूरसंचार माध्यमांचा वापर करुन, दूरभाष आणि दूरचित्रवाणी द्वारे चर्चा केली जाईल.
ब. रुग्णाची शारिरिक तपासणी व्हिडिओ आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून दूर अंतरावरून केली जाऊ शकते.
क. व्हिडीओ प्रसारणात मदत करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राशी संपर्क असलेल्या अथवा नसलेल्या तांत्रिक सल्लागार व्यक्ती टेलिमेडिसिन कक्षात उपस्थित असू शकतात.
ड. रुग्णाचा आवाज, प्रतिमा अथवा दृकश्र्वाव्य माध्यमाद्वारे रुग्णविषयक माहिती साठवली जाऊ शकते.
६. अपुरी माहिती:
मला कल्पना आहे की दूरस्थ वैद्यकीय व्यावसायिकाला पाठवलेली माहिती खालील समस्यांमुळे योग्य वैद्यकीय निर्णय घेण्यासाठी अपुरी असू शकते :
अ. आवाजाच्या गुणवत्तेत कमतरता,
ब. प्रतिमांच्या गुणवत्तेत कमतरता,
क. प्रतिमांच्या रंग संगतीमधील भिन्नता (रंगांमधे विचलन),
ड. डॉक्टर आणि रुग्ण समोरासमोर नसल्यामुळे एकमेकांना समजून घेण्यात कमतरता आणि अडचणी.
७. रुग्णाची माहिती:
रुग्णाने अथवा त्याच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीच्या आधारे टेलीमेडिसिन समुपदेशन दिले जाईल याची मला कल्पना आहे. नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकास बिनचूक माहिती देण्याची जबाबदारी माझी आहे हे मला मान्य आहे. समुपदेशनाच्या वेळी काही माहिती दिली गेली नाही तर त्यामुळे रोगनिदानात आणि उपचारात फरक पडू शकतो हे मला माहित असल्यामुळे अशी विसरलेली / न दिलेली माहिती मी लवकरात लवकर डॉक्टरांना देण्याची हमी देत आहे ज्या योगे उपचारात आवश्यक ते बदल करता येतील.
८. तपासणे :
टेलिमेडिसिन समुपदेशन हे नेहमीप्रमाणे दवाखान्यात जाऊन उपचार घेतल्याप्रमाणेच असेल, परंतू परस्पर संवादी दृकश्राव्य तंत्रज्ञानामार्फत रुग्ण व दूरस्थ डॉक्टरांशी संवाद होईल. दृक्श्राव्य माध्यमातून होणारा संवाद प्रत्यक्ष भेटीतील संवादापेक्षा भिन्न असेल, आणि डॉक्टर अधिक मूल्यमापनासाठी रुग्णाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी पाचारण करु शकतील. डॉक्टर रुग्णाला प्रत्यक्ष तपासू शकत नसल्यामुळे फक्त माहितीच्या आधारे त्यांच्या निदानामधे आणि प्रत्यक्ष तपासणीसाठी बोलावण्याच्या निर्णयामधे त्रुटी राहण्याची अथवा फरक पडण्याची शक्यता मला माहित आहे. प्रत्यक्ष भेटीसाठी डॉक्टरांनी पाचारण केल्यास, तसेच प्रगतीचा पाठपुरावा करण्यासाठी मी दवाखान्यात उपस्थित राहण्याची हमी देत आहे. मी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी जाऊ शकत असल्यास त्यांना भेट्ण्याचा पर्याय मी निवडू शकतो याची मला कल्पना आहे.
९. चाचण्या:
नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने सल्ला दिल्याप्रमाणे आवश्यक त्या चाचण्या करुन घेण्याची मी हमी देत आहे.
१०. रोगनिदान :
मला समजते आणि मी सहमत आहे की, टेलिमिडिसिनच्या माध्यमातून पूर्णपणे रुग्णाने दिलेल्या माहितीच्या आधारे आणि प्रत्यक्ष शारिरिक तपासणी न करता सल्ला देताना, वस्तुस्थितीची जाणीव नसल्याने डॉक्टरांना योग्य मूल्यांकन, निदान आणि उपचार करण्यात मर्यादा असू शकतात. प्रत्यक्ष तपासणी पेक्षा टेलिमेडिसीन चिकित्सा पूर्णपणे वेगळी असून दूरस्थ वैद्यकीय व्यावसायिकाला अंतरामुळे येणार्या मर्यादांमुळे रोगनिदान हे मर्यादित व तात्पुरत्या स्वरुपाचे असते. प्रत्यक्ष तपासणी करून मूल्यांकन करण्याची जागा घेण्याचा टेलिमेडीसिनचा हेतु नसून डॉक्टर फक्त तात्पुरता सल्ला देतात आणि माझ्या सातत्याने लागणार्या वैद्यकीय उपचारांची जबाबदारी घेत नाहीत हे मला माहित आहे.मला कल्पना आहे की. अश्या असामान्य पध्दतीने मला सल्ला देऊन मदत करण्याचा प्रयत्न करताना डॉक्टरांवर अनेक मर्यादा येतात. दूरस्थ समुपदेशानाद्वारे दिल्या जाणार्या सेवेत काही कमतरता राहिल्यास त्याला निष्काळजीपणा / हयगय / दुर्लक्ष म्हणता येणार नाही याची मला जाणीव आहे.
११. सल्ला :
सद्यस्थितीत निरनिराळ्या कारणांमुळे मी दूरस्थित नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाना भेटून नेहमीच्या पध्दतीने सल्ला घेऊ शकत नसल्यामुळे त्यांनी अत्यंत विश्वासाने माझ्या विनंती वरून आपला बहुमोल सल्ला देण्याचे मान्य केले आहे, परंतू वैयक्तिक तपासणी करून अचूक रोगनिदान करण्याच्या सुवर्ण मानक पध्दतीप्रमाणे ते नसू शकेल हे मला स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
१२. शिक्षण:
वैद्यकीय सल्लागार माझ्या बरोबर चर्चा करण्या ऐवजी अथवा लिहून देण्याऐवजी मला चांगल्या पध्दतीने समजण्यासाठी दृक्श्र्वाव्य माध्यम, परस्पर संवादी संगणक प्रणाली, ध्वनिमुद्रित फायली अथवा इतर पध्दतींचा अवलंब करु शकतात याची मला कल्पना आहे.
१३. प्रिस्क्रिप्शन:
सुप्रीम कोर्टाने सर्वसाधारणपणे रुग्णाला प्रत्यक्ष तपासल्याशिवाय प्रिस्क्रिप्शन देऊ नये, तसेच तीव्र आणिबाणीची परिस्थिती असल्याशिवाय दूरध्वनीवरुन औषधोपचार देण्याची प्रवृत्ती टाळावी असे सांगीतले असले, तरी माझ्या विनंतीवरून दूरस्थ वैद्यकीय व्यावसायिकाने मला सेवा देउ केली आहे याची मला जाणीव आहे.
१४. वैद्यकीय माहितीची नोंद:
दूरस्थ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक माझ्या वैद्यकीय माहितीची नोंद त्याच वेळी केस पेपर वर करु शकतात आणि विद्यमान कायद्यानुसार त्याची प्रत मला मिळू शकते. माझी माहिती समुपदेशक, क्लिनिक /रुग्णालयात गोपनीय ठेवतील हे मला समजते.
१५. दृकश्राव्य रेकॉर्डिंग:
टेलिमेडिसीन समुपदेशनाच्या वेळी, व्हिडिओ, ऑडीओ अथवा डिजिटल फोटो साठवला जाऊ शकतो. मी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाला माझ्यावरोबर होणार संभाषण तसेच प्रतिमा साठवून ठेवण्यास समंती देत आहे आणि त्याचा उपयोग वैद्यकीय नोंदींमधे केला जाउ शकतो याची मला कल्पना आहे.
१६. गोपनीयता :
टेलिमेडिसीन समुपदेशकाने गोपनीयतेला असणारा धोका टाळण्यासाठी वाजवी आणि योग्य ते प्रयत्न केलेले आहेत. टेलिमेडिसीनच्या वेळी गोळा केलेल्या व रुग्णाची ओळख पटेल अश्या प्रतिमा अथवा माहिती, संशोधन अथवा इतर संस्थाना, विद्यमान गोपनीयता कायद्याने अधिकृत केल्याशिवाय; माझी परवानगी नसताना दिली जाणार नाही.
१७. धोका:
नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक मला मदत करण्यासाठी धोका पत्करत आहे याचे मला कौतुक वाटते.
१८. रुग्णाने रेकॉर्डिंग करण्याबाबत:
संमतीपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर समुपदेशनाच्या वेळी होणारे संभाषण दूरध्वनीने अथवा दृकश्राव्य माध्यमाद्वारे रुग्ण रेकॉर्ड करु शकतात अथवा क्षकिरण किंवा इतर प्रतिमांची देवाण घेवाण करू शकतात हे मला माहित आहे.
१९. मुक्त करणे :
टेलिमेडिसिन समुपदेशन आणि त्यामधे निघणारे निष्कर्ष व दिल्या जाणार्या शिफारसीं मधे होणार्या "एरर्स आणि ओमिशन्स"; तसेच माहिती असलेल्या अथवा नसलेल्या, कल्पित अथवा अकल्पित, जाणून बुजून अथवा अजाणतेमुळे, कळत अथवा नकळत होणार्या चुका आणि त्यामुळे निर्माण होणारे दावे, नुकसान आणि त्याच्या भरपाईतून डॉक्टर्स क्लिनिक अथवा हॉस्पिटल्स आणि तेथील कर्मचारी तसेच इतर वैद्यकीय व्यावसायिक, विमा कंपन्या, अधिकारी, प्रशासक, आणि संचालकांची संपूर्णपणे आणि अपरिवर्तनियपणे मुक्तता करत आहे. मिळालेली माहिती संपूर्ण आणि अचूक असण्याची, तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसरणामधील दोषांची जबाबदारी डॉक्टरांवर नाही हे मला मान्य आहे.
२०. क्षमता:
टेलिमेडिसिन द्वारा सल्ला मिळण्यासाठी अट म्हणून मी ही संमती कोणत्याही दबावाखाली अथवा सक्तीमुळे देत नाही, तसेच मी कोणत्याही मद्य अथवा औषधाच्या प्रभावाखाली नसून, मी स्वत:च्या मर्जीने ही संमती देत आहे.
२१. मोबदला:
टेलिमेडिसीन समुपदेशनाचा मोबदला देण्यास मी जबाबदार आहे. ह्या सल्ल्यासाठीची फी मला देय आहे हे मला मान्य आहे आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक सांगेल त्या पध्दतीने पैसे देण्याची मी हमी देत आहे. (उदा. पेटीएम, गुगलपे इत्यादी )
२२. शंकासमाधान:
मला सर्व शक्य धोक्यांबद्दल अवगत करण्यात आले असून टेलिमेडिसीन चे फायदे आणि परिणामांबद्द्ल मला कल्पना देण्यात आली आहे. माझ्या स्वास्थ्यासाठी झटणार्या व्यावसायिकांनी मला याबाबत माहिती दिलेली आहे आणि माझ्या शंका विचारण्याची संधी त्यांनी मला दिलेली आहे. माझ्या सर्व प्रशांची उत्तरे मिळालेली आहेत.
२३. मर्यादा:
टेलिमेडिसीन संबंधी नमूद केलेल्या सर्व मर्यादांमुळे होणार्या धोक्यांची संपूर्ण जबाबदारी मी स्वत: स्वीकारत आहे. माझ्या आजारसंबधी अथवा रोगनिदानासंबंधी किंवा निष्पत्तीविषयी कोणत्याही प्रकारची हमी अथवा हवाला मला देण्यात आलेला नाही.
२४. प्रमाणित करणे:
मी प्रमाणित करतो की मी विनंती केल्यावरून डॉ अथवा इतर स्वास्थ्य कर्मी अथवा संस्था माझ्या प्रकृतीविषयक माहिती साठवून ठेऊ शकतात ज्यामधे माझ्या वैद्यकीय तपासण्या, पॅथोलॉजी, प्रयोगशाळा आणि रोगनिदान चाचण्यांचे अहवालांचा समावेश असेल. आवश्यकता असल्यास ही माहिती ते इतर वैद्यकीय व्यावसायिकांना पाठवू शकतात
२५. अर्थबोध:
मराठी भाषेतील आणि देवनागरी लिपीतील वरील मजकूर मी वाचला आहे / मला वाचून दाखवण्यात आला आहे आणि मला तो समजला आहे.
दिनांक _ _ _ _ _ _ _ _ _ रुग्णाची स्वाक्षरी (अथवा रुग्णाशी नाते _ _ _ _ _ _ _ _ _ )
दिनांक _ _ _ _ _ _ _ _ _ साक्षीदार
हे संमतीपत्र Z क्लिनिक / रुग्णालयातील डॉ Ya Yb Yc यांनी टेक माय केअर प्रा. लि. यांनी तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारा पाठवले असून त्याद्वारे रुग्णाला [मला मान्य आहे] या चौकोनात टिक करून [मी संमती देत आहे] या बटणावर क्लिक करून संमती दर्शवण्याची विनंती केली आहे.
www.takeMyCare.in ही वेबसाईट ई-संमतीच्या नोंदी ठेवते आणि रुग्ण आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना ईमेल द्वारे पाठवते.
This work is licensed under a
Creative Commons Attribution-
ShareAlike 3.0 Unported License